सीईओ सत्या, कसोटी क्रिकेट आणि रशियन कादंबरी

मायक्रोसॉफ्टचे नवे सीईओ सत्या नडेला यांचं क्रिकेटशी अनोखं नातं आहे. क्रिकेटने आपल्याला भरपूर काही शिकवलं असं नडेला यांनी म्हटलं आहे. नडेला यांना सर्वात जास्त कसोटी क्रिकेट आवडतं.

Updated: Feb 5, 2014, 05:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मायक्रोसॉफ्टचे नवे सीईओ सत्या नडेला यांचं क्रिकेटशी अनोखं नातं आहे.
क्रिकेटने आपल्याला भरपूर काही शिकवलं असं नडेला यांनी म्हटलं आहे. नडेला यांना सर्वात जास्त कसोटी क्रिकेट आवडतं.
कसोटी क्रिकेट हा जगातला सर्वात जास्त वेळ चालणारा खेळ आहे. कसोटी क्रिकेट हे एखाद्या मोठ्या, लांबलचक रशियन कादंबरी सारखं असतं असंही सत्या नडेला यांनी म्हटलं आहे.
आपण शाळेत असतांना सत्या शाळेच्या टीमचा प्लेअर होता. क्रिकेटमध्येच तो नेतृत्व आणि व्यवस्थापन शिकला आणि आजही ते आपल्या बरोबर आहे आणि आपल्याला कामात येत असल्याचं सत्या नडेला म्हणतो.
बिल गेटस स्टीव बॉमर नंतर सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टचे तिसरे सीईओ आहेत.
सत्या नडेलाला पुस्तक वाचणं अधिक आवडतं आणि तो जेवढे पुस्तक वाचतो, त्यापेक्षा तो जास्त पुस्तक खरेदी करतो. तसेच तो जेवढे ऑनलाईन कोर्सेस करतो, त्यापेक्षा जास्त कोर्सेसना तो अॅडमिशन घेतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.