`ड्रोन`वर ताबा फक्त `गुगल`चा

जगभरात आपले जाळे पसरवण्याचे `फेसबुक`चे स्वप्न आहे. पण `फेसबुक`च्या या स्वप्नांना `गुगल`ने उधळून लावले आहे.

Updated: Apr 20, 2014, 04:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
जगभरात आपले जाळे पसरवण्याचे `फेसबुक`चे स्वप्न आहे. पण `फेसबुक`च्या या स्वप्नांना `गुगल`ने उधळून लावले आहे. लोकांच्या कूठल्याही कामात मदत करणारे सर्च इंजिन `गुगल`ने सौर उर्जेवर आधारीत ड्रोन मेकर `टायटन एअरोस्पेस`वर ताबा मिळवला आहे. खरं तर `टायटन एअरोस्पेस`वर `फेसबुक`ला कब्जा पाहिजे होता. यातून जगभर इंटरनेट पोहचवण्याचा इरादा `फेसबुक`चा होता.
`गुगल`ने व्यवहाराची घोषणा जाहीर करताना,"कृत्रिम ग्रहाच्या आधारे अतिशय दुर्गम अशा भागात इंटरनेट पोहचवणे हा आमचा प्रयत्न आहे. तसेच आपत्कालीन व्यवस्थापन आणि वेगाने घटणारे जंगलांचे प्रमाण आदी समस्या सोडविण्यासाठी आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत." असे सांगितले.
`ड्रोन` ​विमाने तयार करणारी कंपनी `टायटन एअरोस्पेस` ही कंपनी विकत घेण्याची `फेसबुक` कंपनीने घोषणा केली होती. पण त्या आधीच `गुगल`ने `टायटन एअरोस्पेस` ही कंपनी जास्त किंमतीत विकत घेऊन `फेसबुक`ला धक्का दिला.
जगभरात इंटरनेटची व्याप्ती जी कंपनी लवकर करेल. त्याच कंपनीचं इंटरनेटच्या बाजारपेठेवर नियंत्रण राहील असे मत काही तज्ञांनी मांडल आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.