सिंगापूर : डब्ल्यूटीएच्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा - मार्टिना हिंगिस जोडीने आपली विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. यावर्षात चांगली कामगिरी करत या जोडीने यंदाच्या वर्षातील नववे विजेतेपद पटकावले. या जोडीने स्पेनच्या जोडीचा पराभव केला.
टेनिसमध्ये ग्रँडस्लॅमनंतर डब्ल्यूटीए ही सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत सानिया-मार्टिना या जोडीने चांगली कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात सानिया - हिंगिस जोडीसमोर स्पेनच्या गार्बाइन मुरुगुजा आणि कार्ला नुवारो या जोडीचे आव्हान होते. मात्र, हे आव्हान या दुकलीने सहज मोडून काढले.
सानिया - मार्टिनाने स्पेनच्या प्रतिस्पर्धी जोडीचा ६-०, ६-३ असा सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या वर्षातील त्यांचे हे नववे पदक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.