मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने बाजी मारली. या विजयासह मुंबई आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिला विजय नोंदवला.
आयपीएलच्या सामन्यात जय-पराजयासाठी अनेकदा टॉसही कराणीभूत ठरतो. कोलकाता आणि मुंबईच्या या सामन्यात पुन्हा एकदा टॉसने प्रमुख भूमिका बजावली.
वानखेडेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या गेल्या चार सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला हार पत्करावी लागलीये. कालच्या सामन्यातही हेच पाहायला मिळाले.
मुंबईने टॉस जिंकून कोलकात्याला फलंदाजीचे निमंत्रण दिले. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईच्या १८० धावा करत सामना जिंकला.
यात युवा क्रिकेटपटू नितीश राणा आणि हार्दिक पांड्या यांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. संघ संकटात असताना हे दोघेही खेळपट्टीवर टिकून राहिले आणि संघाला सामना जिंकून दिला.