दिलशानचे सलग सात चौकार

वर्ल्डकपच्या 'ग्रुप-ए'मधील ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सामन्यात तिलकरत्नने जोरदार फटकेबाजी केली, ऑस्ट्रेलियाच्या 377 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघ चोख उत्तर दिलं.

Updated: Mar 8, 2015, 03:27 PM IST
दिलशानचे सलग सात चौकार title=

सिडनी : वर्ल्डकपच्या 'ग्रुप-ए'मधील ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सामन्यात तिलकरत्नने जोरदार फटकेबाजी केली, ऑस्ट्रेलियाच्या 377 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघ चोख उत्तर दिलं.

तिलकरत्ने दिलशानने मिचेल जॉन्सनच्या एका ओव्हरमध्ये सलग ६  चौकार ठोकण्याचा पराक्रम केलाय. दिलशानने जॉनसनच्या गोलंदाजीवर स्ट्रेट डाईव्ह, डीप मिडविकेट, एक्स्ट्रा कव्हर बाऊंड्री अशी फटकेबाजी करत चौकार मारले.
 
श्रीलंकन डावाच्या सहाव्या षटकात दिलशानने ऑस्ट्रेलियन गोलंदाज जॉनसनवर प्रहार करत सहा चौकार लगावले. ही ओव्हर ४,४,४,४,४,४ अशी होती.  त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुमार संगकाराने तीन धावा काढल्या. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या दिलशानने वॉटसनला चौकार लगावला आणि अशाप्रकार त्याने सलग सात चौकार ठोकले.
 
याआधी ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात ३७६ धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर ३७७ धावांचं मोठं आव्हान आहे. ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषकातील दुसरं सर्वात जलद शतक ठोकलं. त्याने अवघ्या ५१ चेंडूत शतकाला गवसणी घातली. मात्र १०२ धावांवर तो परेराच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.