Records:IPLचे असे काही रेकॉर्ड्स जे आजवर तुटले नाहीत

आयपीएलच्या जत्रेचा ८ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. आयपीएलच्या प्रत्येक सत्रात अनेक नवीन रेकॉर्ड होतात आणि तुटतात. मात्र आयपीएलचे असे काही रेकॉर्ड आहेत की जे आजवर तुटले नाहीत. एक नजर टाकूया अशा रेकॉर्ड्सवर.

Updated: Apr 9, 2015, 06:26 PM IST

मुंबई : आयपीएलच्या जत्रेचा ८ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. आयपीएलच्या प्रत्येक सत्रात अनेक नवीन रेकॉर्ड होतात आणि तुटतात. मात्र आयपीएलचे असे काही रेकॉर्ड आहेत की जे आजवर तुटले नाहीत. एक नजर टाकूया अशा रेकॉर्ड्सवर.

सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड
आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड राजस्थानच्या सोहेल तन्वीरच्या नावे आहे. सोहेलने ४ मे २००८ला जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये चेन्नई सुपरकिंग्सविरूद्ध हा कारनामा केला होता. सोहेलने १४ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये सोहेल एकमेव खेळाडू आहे ज्याने ६ विकेट घेतल्या आहेत. 

सर्वात मोठ्या लक्षाचा पाठलाग
सर्वात मोठ्या लक्षाचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड राजस्थान रॉयलच्या नावे आहे. राजस्थान रॉयलने हा रेकॉर्ड २००८ मध्ये बनवला होता. हैदराबादच्या गांधी स्टेडिअममध्ये डेक्कन चाजर्स विरूद्ध खेळतांना हा रेकॉर्ड त्यांना बनवला होता. या मॅचमध्ये राजस्थानने २१७ रनांचा पाठलाग करून सामना जिंकला होता. 

सर्वात मोठ्या फरकाने विजय
आयपीएलमध्ये सर्वात मोठ्या फरकाने जिंकण्याचा रेकॉर्ड कोलकत्ता नाईट रायडरच्या नावे आहे. हा रेकॉर्ड कोलकाताने १८ एप्रिल २००८मध्ये बंगलुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलुरूला हरवून बनवला होता. ही मॅच कोलकाताने १४० रन्सनी जिंकली होती. 

एक डावात सर्वाधिक एक्स्ट्रा रन
एका डावात सर्वाधिक अतिरिक्त धावा देण्याचा रेकॉर्ड आयपीएल-१मध्ये झाला होता. २० एप्रिलला कोलकाता नाईट रायडरविरूद्ध खेळतांना डेक्कन चाजर्सने हा रेकॉर्ड बनवला होता. डेक्कन चाजर्सने या सामन्यात एकूण २० एक्स्ट्रा रन दिले होते. 

५.३ ओव्हरमध्येच जिंकली टीम
हा रेकॉर्ड मुंबई इंडियन्सच्या नावे आहे. १६ मे २००८ला वानखेडे स्टेडिअममध्ये कोलकाता नाईट रायडरविरूध्द खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये मुंबईने हा रेकॉर्ड बनवला होता. कोलकाताने पहिली बॅटिंग करत ६७ रन केले होते. त्याचा पाठलाग करतांना केवळ ५.३ ओव्हरमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.