नवी दिल्ली : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिके दरम्यान पुढची टेस्ट मॅच २५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंना नक्कीच एका खेळाडूची तीव्रतेने आठवण येणार आहे... तो खेळाडू म्हणजे विरेंद्र सेहवाग...
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान ही मॅच रंगणार आहे. वीरेंद्र सेहवागनं नुकतीच निवृत्तीची घोषणा केलीय. साहजिकच तो या टेस्टमध्ये नसेल... परंतु, विदर्भाच्या या मैदानावर वीरुच्या कामगिरीचा आढावा घेतला तर त्याची कमतरता का भासेल हे वेगळं सांगण्याची गरज उरणार नाही.
आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेस वीरू नागपूरच्या या मैदानावर उतरलाय... त्याचं धुवाँधार खेळी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळालीय.
नागपूरमध्ये सेहवागची खेळी...
मॅच : ४
सरासरी : ५९.५०
स्ट्राईक रेट : ८७.२९
रन : ३५७
शतक : १
अर्धशतक : ३
हे आकडे पाहिल्यानंतर दमदार वीरुचा जबरदस्त आत्मविश्वासानं भरलेली मुद्रा तुमच्याही डोळ्यांसमोर आलीच असेल... यंदा तो या मैदानावर मात्र खेळण्यासाठी नसला तरी त्याच्या शुभेच्छा मात्र खेळाडूंसोबतच आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.