आशिया कप आधी भारताला धक्का

आशिया कप टी-20 अजून सुरु झालेला नाही, पण याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Feb 25, 2016, 04:18 PM IST
आशिया कप आधी भारताला धक्का title=

मुंबई: आशिया कप टी-20 अजून सुरु झालेला नाही, पण याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीला या स्पर्धेला मुकावं लागणार आहे. 

तसंच टी-20 वर्ल्ड कपमधल्या त्याच्या खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शमीच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती, पण या दुखापतीतून शमी अजूनही सावरलेला नाही, त्यामुळे त्याला आशिया कपमधून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या ऐवजी भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.