नवी दिल्ली : क्रिकेट जगतातील महान खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या जॅक कॅलिसनं क्रिकेटला अलविदा केलाय. साऊथ आफ्रिकेचा खेळाडू असलेला जॅक आता क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारामध्ये खेळताना दिसणार नाही.
बुधवारी, जॅक कॅलिसनं आपल्या निवृत्तीची घोषणा केलीय. जॅकनं एका वर्षापूर्वी टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्यानंतर, 38 वर्षांचा या खेळाडूनं टेस्ट क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली असली तरी तो वन डे क्रिकेटसाठी उपलब्द राहील... त्याला वर्ल्डकप 2015 मध्ये खेळायचंय... असं साऊथ आफ्रिकेनं म्हटलं होतं.
परंतु, वर्ल्डकप 2015 मध्ये खेळण्या अगोदरच निवृत्तीच्या निर्णयामुळे कॅलिसचे चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ज्ञांनाही चांगलाच धक्का बसलाय.
जॅकनं नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे मॅचमध्ये खराब बॅटींग केली होती. त्यानं तीन संधीमध्ये केवळ पाच रन्स केलेत.
साऊथ आफ्रिकेनं अद्याप एकदाही आयसीसी वर्ल्डकप जिंकलेला नाही. अशातच, पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या अगोदरच जॅक कॅलिसच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे साऊथ आफ्रिकेची तयारीलाही धक्का बसलाय.
कॅलिस जगातील महान ऑलराऊंडर खेळाडुंपैंकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचे रेकॉर्डस् त्याच्या महानतेची साक्ष पटवून देण्यासाठी पुरेसे आहेत.
कॅलिसनं साऊथ आफ्रिकेकडून 328 वन डे मॅच खेळल्या आहेत. त्यानं वन डेमध्ये 11,579 रन्स बनवलेत आणि 273 विकेटसही मिळवल्यात. कॅलिसच्या नावावर 166 टेस्टमध्ये 13,289 रन्स आहेत. कॅलिसच्या नावावर 200 कॅच घेण्याचाही रेकॉर्ड आहे.
जॅक सचिन तेंडुलकर (15,921) आणि रिकी पॉन्टिंग (13,378) यांच्या मागेच आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये तेंडुलकर (51) नंतर कॅलिसनंच सर्वाधिक म्हणजेच 45 शतक ठोकलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.