मेलबर्न : भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप २०११मध्ये विश्व विजेत्याचा चषक उंचावण्यात यशस्वी झाला त्याचे प्रमुख कारण होते युवराज सिंग... युवराजसिंग याने गेल्या वर्ल्ड कपमध्ये एकूम १५ विकेट घेतल्या होत्या. भारतीय कर्णधाराचे म्हणणे आहे की गेल्या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडू राहिलेल्या युवराज सिंगला बदललेल्या नियमांचा फटका बसला आणि त्यामुळे त्याला टीममध्ये घेता आले नाही.
३० मीटरच्या बाहेर केवळ ४ क्षेत्ररक्षक ठेवण्याच्या नियमांवर बोलताना धोनीने सांगितले की, या नियमांमुळे युवराज सिंग सारख्या खेळाडूला आम्हांला मुकावे लागले. त्याच्या डावखुऱ्या गोलंदाजीचा फायदा आम्हांला मागील वर्ल्ड कपमध्ये झाला.
आता युवराजच्या ऐवजी सुरेश रैना ही भूमिका बजावेल का या प्रश्नावर धोनी म्हणाला, तुम्हांला माहीत असेल की नियम बदलल्यानंतर युवराजने अधिक गोलंदाजी केलेली नाही. नियमांच्या बदलांमुळे त्याच्या गोलंदाजीवरही परिणाम झाला. पण टी २०मध्ये तो नियमित गोलंदाजी करतो.
धोनी ४ क्षेत्ररक्षकांना ३० गजच्या बाहेर ठेवण्यांच्या नियमांचे धोनीने कधीच समर्थन केले नव्हते. त्याच्यामते त्याच्याकडे अनेक पार्टटाइम गोलंदाज होते. सचिन तेंडुलकर, सेहवाग या बदलल्या नियमांमुले अधिक प्रभावी राहिले नाही. जो पर्यंत क्षेत्ररक्षणाचा हा नियम नव्हता तोपर्यंत वीरू पाजी, सचिन पाजी आणि युवी गोलंदाजी करू शकत होता. आम्ही त्यांच्यावर अवलंबून होतो. पण ते पार्ट टाइम बॉलर होते. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या विकेटवर त्यांनी गोलंदाजी करणे अवघड होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.