ब्राव्हो! दोन्ही हात गमावूनही तो बनला 'क्रिकेटर'!

दिव्यांग असलेला आमीर हुसैन मोठ्या खुबीन क्रिकेट खेळतोय. आमीरला दोन्ही हात नाही आहेत. मात्र तरीही उत्तम प्रकारे क्रिकेट खेळून त्यानं इतरांसमोर आदर्शच निर्माण केला आहे.

Updated: Feb 12, 2016, 11:43 PM IST
ब्राव्हो! दोन्ही हात गमावूनही तो बनला 'क्रिकेटर'! title=

जम्मू-काश्मीर : दिव्यांग असलेला आमीर हुसैन मोठ्या खुबीन क्रिकेट खेळतोय. आमीरला दोन्ही हात नाही आहेत. मात्र तरीही उत्तम प्रकारे क्रिकेट खेळून त्यानं इतरांसमोर आदर्शच निर्माण केला आहे.

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये आमीर लहानाचा मोठा झालाय. विशेष म्हणजे तो पायानंच सहजपणे बॉलिंगही करतो. तर बॅटिंग करण्यात आमीर विशेष तरबेज आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यानं आपल्या अपंगत्वावर मात करत सर्वांनाच धडा घालून दिलाय. लहानपणी लाकडं कापण्याच्या मशिनमध्ये त्याचे दोन्ही हात अडकल्यानं त्याला ते गमवावे लागले होते.