हैदराबाद : ‘बोर्ड रुम’मध्ये बिर्याणी खायला मनाई केली म्हणून चिडलेल्या महेंद्रसिंग धोनीनं आपल्या टीमसोबत हॉटेलच सोडलं... ही घटना घडलीय हैदराबादमध्ये...
हैदराबादची बिर्याणी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी यालाही ही ‘हैदराबादी बिर्याणी’ प्रचंड आवडते.
‘केकेआर’ टीम चॅम्पियन लीगमधली पहिली मॅच खेळण्यासाठी हैदराबादला आली असताना ते ‘ग्रॅन्ड ककातिया’ या हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी, टीममेट अंबाती रायडू याने आपल्या घरून टीमसाठी बिर्याणी पाठविली होती. मग काय, हैदराबादी बिर्याणीवर ताव मारण्यासाठी सगळे खेळाडू बोर्ड रुममध्येच (मिटिंग रुम) बसले.
पण, याला हरकत घेत हॉटेल प्रशासनानं खेळाडुंना बोर्ड रुममध्ये बिर्याणी खाण्यास हरकत घेतली. इतर खेळाडू बिर्याणी आपल्या रुममध्ये घेऊन जाण्यास तयार झाले होते. मात्र, टीमचा कॅप्टन धोनी यामुळे भलताच चिडला... आणि त्यानं इतर खेळाडुंसहीत या हॉटेलचं बुकींग तत्काळ रद्द केलं.
यानंतर संपूर्ण टीम ताज कृष्णा हॉटेलमध्ये दाखल झाले. एव्हढच नव्हे तर एन. श्रीनिवासन आणि बीसीसीआयच्या अनेक अधिकाऱ्यांनीदेखील यानंतर ‘ग्रॅन्ड ककातिया’ हॉटेल सोडून ‘ताज कृष्णा’ गाठलं.
चेन्नई सुपर किंग्सच्या प्रवक्त्यांनी मात्र या प्रकरणावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिलाय... मात्र, हॉटेल बदलल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिलाय.
‘चेन्नई सुपर किंग्स’ सध्या बंगळुरूमध्ये आहे. 22 सप्टेंबर रोजी ‘टीम डॉल्फिन्स’शी चेन्नईची लढत होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.