राज ठाकरेंची विहीर पाहणी, कार्यकर्त्यांना शाबासकी

राज ठाकरेंनी औरंगाबादेतीस समर्थ नगरात आज एका विहिरीची पाहणी केली.. काही दिवसांपूर्वी मनसेनं या विहिरीचा गाळ काढून विहिरीची साफसफाई केली होती.

Updated: Mar 1, 2013, 09:23 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
राज ठाकरेंनी औरंगाबादेतीस समर्थ नगरात आज एका विहिरीची पाहणी केली.. काही दिवसांपूर्वी मनसेनं या विहिरीचा गाळ काढून विहिरीची साफसफाई केली होती.. आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप देण्यासाठी ठाकरेंनी विहिरीच्या साफसफाई कामाची स्वत पाहणी केली..
यावेळी कार्यकर्त्यांनी अशीच शहराच्या भल्यासाठी काम करीत राहावी महापालिका मदत करीत नसेल तर मनसे त्यासाठी स्वत: निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन मनसेच्या वतीनं देण्यात आले. तसेच याबाबत राज ठाकरे यांनी कालच याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

शहरातील अशा विहिरींच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शहराला पाणी उपलब्ध करून देऊ शकतो, "विहिरींची साफसफाई आणि काही ठिकाणी खोली वाढविण्याची गरज आहे. यासाठी एका विहिरीला किमान दोन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही संकल्पना आवडल्यानंतर राज ठाकरे यांनी तातडीने शहरातील विहिरींचा अहवाल तयार करून, विहिरी दुरुस्तीसाठी किती खर्च येईल, तुम्ही किती खर्च करू शकता, याची सविस्तर माहिती 15 दिवसांनी सादर करण्याचे सांगितले. या उपक्रमासाठी मी निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाहीही दिली आहे.