www.24taas.com, झी मीडिया, पुणे
संजय दत्तला यावेळी त्याला तब्बल महिनाभर म्हणजेच ३० दिवस सुट्टी मिळणार आहे. पत्नी मान्यताची प्रकृती ठीक नसल्याने पॅरोल मंजूर झाला आहे. उद्या सकाळी संजूबाबा पुन्हा जेलबाहेर येईल.
पॅरोलची सुट्टी कोणाला मिळते
- आई आजारी, तर कुणाचे वडील, कोणी बहीण, तर कोणी पत्नी किंवा मुलगा, मुलगी गंभीर आजारी असल्याचं कारण असल्यास कैद्याला रजेवर जाण्याचा अधिकार आहे. संचित आणि पॅरोल अशा दोन रजा त्याला मिळतात.
- पॅरोल रजा मंजुरीसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली जाते. पोलिस सर्वसाधारण सर्वच प्रकरणांत परवानगी नाकारतात. त्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्त आणि तिथून मंत्रालयात जातं. तिथंही निर्णय झाला नाही तर कैदी थेट उच्च न्यायालय, आणि मानवी हक्क आयोगाकडे जातात.
पॅरोल रजा म्हणजे काय
कैद्याचा जवळचा नातेवाइक आजारी असेल किंवा मृत्यू झाल्यावर पॅरोल रजा मंजूर होते. यासाठी कैद्यी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करतो. तो अर्ज पोलीस, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येतो. पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर कारागृह विभागीय आयुक्त कैद्याला किमान 30 दिवसांची पॅरोल रजा देतात. ती जास्तीत जास्त 90 दिवस देता येते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.