मनसे महिला नगरसेवकाला दंड ठोठावलाय

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोटे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र निवडणूक आयोगाला सादर केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहीरट यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय. दंडाची ही रक्कम सहा आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 23, 2013, 10:21 AM IST

www.24taas.com, मुंबई
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोटे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र निवडणूक आयोगाला सादर केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहीरट यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय. दंडाची ही रक्कम सहा आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
अर्ज भरताना उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे का, याची तपासणी निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. त्यावेळी त्यांनी बोगस कागदपत्रांची पूर्तता केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बहीरट यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलेय.

बहीरट यांनी आपल्या विरोधातील निर्णयाला आव्हान उच्च न्यायालयात दिले. २ एप्रिल रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी न्यायालयाने दोन्ही प्रमाणपत्रांची तपासणी केली. यावेळी दोन्ही प्रमाणपत्रे खोटी असल्याचे निदर्शनास आल्याने बहीरट यांना २५ हजारांचा दंड ठोठावला.
बहीरट यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला खर्च आला असल्याने दंडाची संपूर्ण रक्कम आयोगाच्या कार्यालयात भरण्याचे आदेश न्यायालायने दिलेत.