www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवली
प्रशांत दामले फॅन फाउंडेशन निर्मीत `नकळत दिसले सारे` या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला. नाटकाच्या शुभारंभाचा नारळ ख्यातनाम नेत्र चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते वाढवण्यात आला.
यानिमित्ताने ‘झी २४ तास’ मंगेशदा क्रिया योग फाऊंडेशन आणि ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’च्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान मोहिमही सुरू करण्यात आली आहे. यावेळी अभिनेते प्रशांत दामले आणि कुटुंबrयांनी नेत्रदानाचा फॉर्म भरून ‘झी २४ तास’च्या या सामाजिक बांधिलकीच्या नेत्रदान मोहिमेची सुरूवात करून दिली.
`झी २४ तास`चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर आणि सद्गुरू मंगेशदा क्रिया योग फाउंडेशनचे मंगेशदा याप्रसंगी उपस्थित होते. `नकळत दिसले सारे` या नव्या नाटकामध्ये नेत्रहीन लोकांची व्यथा मांडण्यात आली असून, नेत्रदानाचा संदेशही देण्यात आलाय
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.