मुंबई : मुंबईत किरकोळ वादातून पाच जणांनी एकाही हत्या केल्याची घटना घडलीय.
या प्रकरणातील पाच आरोपींना अटक झाली असून धक्कादायक बाब म्हणजे यात एका पोलीस हवालदाराच्या मुलाचाही समावेश आहे.
अफझल बेग असं या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 22 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये पोलिसांना एक तरुण जखमी अवस्थेत सापडला होता. त्याला पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं.
तपास करताना पोलिसांनी जवळच्याच सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं... त्यात मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली सापडली. त्यानंतर पोलिसांनी ही मारहाण करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलं.
मोटरसायकलला झालेल्या किरकोळ अपघातावरून या तरुणांमध्ये वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी अफजलला बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय.
आरोपींनी अफजल बेगला बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकनं प्रहारही केले. रुग्णालयात उपचारादरम्यान बेगचा मृत्यू झालाय.
आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी बेगला अगोदरपासूनच ओळखत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिलीय.
व्हिडिओ पाहा:-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.