लिंबू, खिळे ठोकलेला भोपळा आणि कुंकू ....नोकरीवरुन काढलं म्हणून ऑफिसच्या बाहेर जादूटोणा

नोकरीवरुन काढून टाकलं तर सामान्यपणे लोक नाराज होतात आणि नवी नोकरी शोधू लागतात. पण एका व्यक्तीने नोकरीवरुन काढल्यावर चक्क Black Magic केल्याच समोर आलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 22, 2025, 02:43 PM IST
लिंबू, खिळे ठोकलेला भोपळा आणि कुंकू ....नोकरीवरुन काढलं म्हणून ऑफिसच्या बाहेर जादूटोणा  title=

नोकरीवरुन काढून टाकलं तर कर्मचाऱ्यासाठी तो मोठा धक्का असतो. कारण अनेकांना उदरनिर्वाह हा नोकरीवर अवलंबून असतो. पण एका व्यक्तीने नोकरीवरुन काढून टाकल्यावर ऑफिसच्या बाहेरच काळी जादू केल्याच उघड झालं आहे. ऑफिसच्या बाहेरचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

कर्नाटकातील बेल्लारी येथील केएमएफ कंपनीत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर, बदला घेण्याच्या इच्छेने एकाने ऑफिसबाहेर काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या गेटवर असे दृश्य पाहून इतर कर्मचारीही घाबरले. कारण ऑफिसच्या गेटवर काळ्या बाहुलीपासून लिंबू आणि कुंकुपर्यंतच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. 

काळी बाहुली, लिंबू आणि लाल कुंकू.... 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही अज्ञात लोकांनी केएमएफ (कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेड) च्या प्रशासकीय कार्यालयाबाहेर काळी जादू केली. हे पाहून कंपनीत काम करणारे इतर कर्मचारीही हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की ही घटना कंपनीत काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांनी घडवून आणली आहे.

माजी कर्मचारी अचानक कामावरुन काढून टाकल्यामुळे चांगलेच नाराज झाले होते. अशातच त्यांनी कंपनीच्या गेटबाहेर काळी जादू केली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यानुसार, कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या बाहेर मोठा भोपळा, काळी बाहुली, 8 ते 10 लिंबू, नारळ, केशर आणि कुंकू पसरवलं होतं. 

भोपळ्यावर ठोकले खिळे 

फोटोत दिसणाऱ्या भोपळ्यात पाच खिळेही ठोकलेले आहेत. या जादूटोण्यात, सर्व वस्तूंमध्ये एक ताबीज देखील ठेवले जाते. कंपनीबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कोणताही काळा जादूगार दिसला नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. तसेच कोणतीही सिक्युरिटी दिसत नाही. पण अनुमानांनुसार, ही घटना कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी घडवून आणली!

तरीही हे कोणाचे काम असू शकते हे कोणीही स्पष्टपणे पुष्टी केलेले नाही. असेही म्हटले जात आहे की, केएमएफ कंपनी सध्या तोट्यात आहे आणि त्यांनी ऑफिसमधून काढून टाकण्यासाठी 50 जणांची यादी केली आहे. हे त्यांच्यापैकी एकाचे कृत्य असू शकते!

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली बातमी ही केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)