आउटसाइडर म्हणून कार्तिक आर्यनसोबत इंडस्ट्रीत भेदभाव; अनेकदा पचवले यश, म्हणाला, "मला आणखी संधी..."

इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत कार्तिकला स्टार किड्स आणि आउटसाइडरमधील भेदभावाबद्दल विचारण्यात आले होते. यावर कार्तिकने बॉलिवूडमधील आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. 

Updated: Jan 22, 2025, 03:56 PM IST
आउटसाइडर म्हणून कार्तिक आर्यनसोबत इंडस्ट्रीत भेदभाव; अनेकदा पचवले यश, म्हणाला, "मला आणखी संधी..." title=

Kartik Aryan in Bollywood: बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन हा एक असा अभिनेता आहे ज्याने स्वत:च्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवणे हे मुळीच सोपे नसते. यामागे कलाकारांचे खूप कष्ट असतात. विशेषत: अभिनयक्षेत्रात आउटसाइडरना खूपच मेहनत घ्यावी लागते. आपल्या स्वत:च्या अभिनयाच्या कलेने चित्रपटसृष्टीत स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये कार्तिक आर्यनचं सुद्धा नाव घेतलं जातं. 

कार्तिक सध्या त्याच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या यशामुळे कार्तिकच्या चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगल्याची पाहायला मिळत आहे. कार्तिकचा अभिनयक्षेत्रातील आजपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. कार्तिकने नुकत्याच आपल्या मुलाखतीत एक अभिनेता म्हणून त्याने केलेला संघर्ष तसेच इंडस्ट्रीतील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. 

इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत कार्तिकला स्टार किड्स आणि आउटसाइडरमधील भेदभावाबद्दल विचारण्यात आले होते. यावर उत्तर देत कार्तिक म्हणाला, ""सुरुवातीला हे सोपे नव्हते. पण आता मी इतकी वर्षे इंडस्ट्रीत आहे की काही फरक पडत नाही. खरंतर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना समान संधी मिळते असं मी म्हणू शकत नाही. कारण मलाही असं वाटतं की स्टार कीड्स पेक्षा मला संधी द्यायला हवी होती." तसेच, कोणत्याही दोन कलाकारांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा वेगळा असतो आणि त्याची तुलना करणं चुकीचं असल्याचं कार्तिकने पुढे सांगितलं. 

सुरुवातीला मिळाले अपयश

कार्तिकने आपल्या ऑडीशनच्या काळातीलसुद्धा काही किस्से सांगितले. त्याने सुरुवातीला बरेचसे ऑडीशन दिले आणि त्यातुन त्याला सातत्याने नकार पचवावे लागले. तसेच, कार्तिक सतत 2 ते 3 वर्ष सातत्याने ऑडिशन देत होता मात्र, त्याला यातून नेहमी नकार पचवावे लागले. मात्र, कित्येक प्रयत्नांनंतर 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून त्याला संधी मिळाली आणि या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हे सर्व कार्तिकने आपल्या मुलाखतीत सांगितले. 

हे ही वाचा: ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच केला घात! 12 लाख घेऊन अभिनेत्रीचा CA फरार; म्हणाली, '2 वर्षांची...

स्वत:वर विश्वास ठेवला

कार्तिन म्हणाला, "मला रिजेक्शनची सवय झाली होती. एका काळानंतर तर कोण काय बोलेल याचा मला फरक पडत नव्हता. परंतु, तुम्ही काय आहात, हे तुम्हाला दाखवून द्यावं लागतं आणि यासाठी तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवावा लागतो. सर्वात मोठ्या नकारानंतर मी विचार केला की यापेक्षा वाईट काय असू शकतं? माझा नेहमीच मेनिफेस्टेशनवर विश्वास होता. मला जे काही हवं असायचं ते मी लिहायचो. सर्व काही माझ्या वहीत लिहिलेलं आहे."

कार्तिक आर्यन अनीस बज्मी यांच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटात झळकला. या चित्रपटात त्याच्यासोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांनीसुद्धा काम केले आहे. तसेच, त्याचे आगामी चित्रपट 'आशिकी 3' आणि 'तू मेरी मै तेरा' यांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.