मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये भडकलेल्या आगीत तेल ओतण्याचं कामही राष्ट्रवादीनं सुरू केल्याचं दिसतंय.
सभागृहाचा खेळ सुरू असतानाच आज राष्ट्रवादीनं 'ये अंदर की बात है... उद्धव हमारे साथ है...' अशा घोषणा दिल्या. त्यामुळे, अगोदरच शिवसेना - भाजप यांच्या ताणलेल्या संबंधात या घोषणा भलत्याच भाव खाऊन जातायत.
शिवसेना आमदारांच्या बैठकीत भाजपावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. अशा वेळी राष्ट्रवादीच्या या घोषणाबाजीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.