मुंबई : ऊन पावसाची तमा न बाळगता कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना तहान भूक विसरावी लागते. पण, नागरिकांनाही आपली काळजी आहे हे पाहून पोलीसही भावूक झालेले दिसले.
पोलिसांसाठी ठाण्यातल्या 'ठाणे सिटिझन व्हॉईस' या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे ५०० बॉक्स वाटले... शहरातल्या वाहतूक शाखेच्या मुख्य शाखेसह इतर पाच उपशाखांमध्ये बॉक्स वाटले. यावेळी, अनेक पोलीस भावूक झाले होते.
सेवेवर असताना तहान लागली तरी पोलिसांना पाणी पिण्यासाठी जाता येत नाही. आता तर भर उन्हात पोलीस वाहतूक नियंत्रणात व्यग्र असतात. यासाठीच ठाणे सिटिझन व्हॉईस संस्थेनं के. सी. इंजिनिअरिंग कॉलेज, बीम्स विद्यालय यांच्यावतीनं ३०० बॉक्स युरो विद्यालयाच्या वतीनं १०० आणि नीलकंठ टॉवरच्या वतीनं ६० बॉक्सचं वाटप करण्यात आलं.
विशेष म्हणजे, वावेकर रुग्णालयाच्या वतीनं कापुरबावडीमधल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना दोन महिने पाण्याचं वाटप करण्यात येणार आहे.