आयसीआयसीआय आणि स्टेट बँकेची व्याजदरात कपात

आता एक आनंदाची बातमी... स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेने सर्व कर्जांवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं आयसीआयसीआय आणि एसबीआयच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Updated: Apr 7, 2015, 09:00 PM IST
आयसीआयसीआय आणि स्टेट बँकेची व्याजदरात कपात title=

मुंबई : आता एक आनंदाची बातमी... स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेने सर्व कर्जांवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं आयसीआयसीआय आणि एसबीआयच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आयसीआयसीआय बेस रेटमध्येच 0.25 टक्क्यांनी  आणि एसबीआयनं बेस रेटमध्येच 0.15 टक्क्यांनी कपात केलीय. त्यामुळं आता एसबीआयचे व्याजदर 10 टक्क्यांवरून 9.85 टक्क्यांवर येणार आहे.

10 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ करण्याच्या निर्णय घेण्यात आलाय. याचा फायदा पेन्शनधारकांनाही होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.