मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई शेअर बाजारात मंगळवार विक्रीचा जोर असल्याने मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ६२९ अंशांनी कोसळला आणि २६ हजार ८७७ पातळीवर बंद झाला. 

Updated: May 12, 2015, 06:32 PM IST
मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण title=

मुंबई : मुंबई शेअर बाजारात मंगळवार विक्रीचा जोर असल्याने मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ६२९ अंशांनी कोसळला आणि २६ हजार ८७७ पातळीवर बंद झाला. 

तसेच राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी १९४ अंशांनी घसरून बंद झाला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक, माध्यम, अर्थ, ऊर्जा आणि बॅंक निफ्टी घसरले आहेत. हिरो मोटोकॉर्प, डॉ रेड्डी आणि कोल इंडिया यांचे शेअर्स आज सर्वाधिक वधारले होते तर बॅंक ऑफ बडोदा, आणि टाटा स्टील यांचे भाव घसरुन बंद झाले.

मिडकॅप निर्देशांक १.५ टक्‍क्‍यांनी कोसळून १२ हजार ५७७ पातळीवर तर स्मॉलकॅप निर्देशांक ५ हजार ३३६ पातळीवर व्यवहार करत २.२  टक्‍क्‍यांनी घसरला आहे. राष्ट्रीय शेअर निर्देशांक निफ्टी १९४ अंशांनी घसरून ८ हजार १२८ पातळीवर व्यवहार करत बंद झाला आहे. इतर सर्व क्षेत्रात नकारात्मक व्यवहार होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.