मुंबई : अभिनेता सलमान खानच्या व्यवस्थापकाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. अभिनेता सलमान खान विरोधात मागील काही दिवसांपासून व्हॉटसअॅपवर वादग्रस्त मजकूर असलेल्या पोस्ट आणि छायाचित्र पसरवले जात आहेत, त्या विरोधात ही तक्रार आहे.
सलमान खानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे, त्याच्याशी संबंधित हा मजकूर असल्याचं सांगण्यात येत आहे, तसेच या सिनेमात सलमान विशिष्ट समाजाबद्दल अनुद्गार काढत असल्याचा गैरसमज पसरवण्यात येत असल्याचा सलमानच्या व्यवस्थापकाचा आरोप आहे.
मुंबई गुन्हेशाखेकडे देखिल ही तक्रार देण्यात आली आहे, सलमानचा या वक्तव्याशी काहीही संबंध नसून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा खोळसाळपणा असल्याचं तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी सायबर सेलकडे अजून गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र गुन्हे शाखा याचा तपास करीत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.