मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाला १३ वर्ष झाले आहेत, तेव्हा महिन्याभरात प्रकरण निकाली काढा, अशा सूचना सत्र न्यायालयाने सरकारी वकिलांना दिल्या आहेत. याबाबत वकिलांनीही सकारात्मक उत्तर दिलं असल्याचं सांगण्यात येतंय.
डिसेंबर महिन्यापर्यंत या प्रकरणाचा निकाल लावा, असं न्यायालयाने म्हटलं आहे. हिट अँड रन प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबरला होणार आहे. हे प्रकरण २००२ चं असल्याचे प्रकरण तब्बल १३ वर्षांपासून सुरु आहे.
वकिलांनी आज या प्रकरणातील दोन साक्षीदारांचा जबाब नोंदवला. अमेरिकन लॉण्ड्रीचा मॅनेजर मार्क डिसूजा आणि सलमानच्या गाडीचा विमा काढणारा गुरुचरण मल्होत्रा यांची साक्ष नोंदवण्यात आली.
दरम्यान, आजच्या सुनावणीदरम्यान सलमान खानला कोर्टात हजर नव्हता. मात्र पुढील सुनावणीला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोर्टात आज सरकारी वकिल आणि सलमानच्या वकिलांमध्ये जोरदार प्रतिवाद झाला. सरकारी वकिलांनी साक्षीदारांची यादी दिली नाही, असा आरोप सलमानच्या वकिलांनी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.