www.24taas.com, मुंबई
कल्याण- कसारा मार्गावर लोकलमधून दारूची तस्करी होत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. कल्याण- शहाड सारख्या शहरातून होलसेल भावात दारू विकत घेऊन ते रेल्वेतून सर्रास सुरू आहेत.
मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी कसारा या प्रमुख शहरांमध्ये गावठी दारूसह देशी-विदेशी दारू दिव-दमण या भागातील बनावट दारू विक्रेत्यांकडे उपलब्ध असते. देशी-विदेशी दारू परवान्याशिवाय विकणे गुन्हा आहे. मात्र तसे असतानाही या भागात मोठ्या प्रमाणात दारूचा पूर वाहत आहे.
रात्रीच्या वेळी फर्स्ट क्लास व लगेजच्या डब्यात वेगळेच दृश्य दिसून येते. कल्याण ते आसनगाव, आटगावपर्यंत मोठा धांगडधिंगा असतो. परंतु या सगळ्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना असतानासुद्धा आरपीअफ किंवा जीआरपी चिरीमिरी घेऊन याकडे दुर्लक्ष करतात.