मुंबई : भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात मुंबईत धडाक्याने उड्डाण पूल उभारणा-या तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी आता मुंबईतल्या जलवाहतुकीच्या विकासासाठी सज्ज झाले आहेत. राज्य सरकारकडून मुंबईत जलवाहतूक शक्य होत नसेल तर केंद्र सहकार्य करणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय.
केंद्र सरकार पंतप्रधान जलमार्ग योजना सुरू करत आहे. या अंतर्गत मुंबईतल्या जलवाहतुकीचा विकास केला जाईल. मरिन ड्राईव्हच्या समुद्रात ५०० रुम्सचं ह़ॉटेल उभारण्याचा प्रस्ताव असून चार फ्लोटिंग रेस्टॉरंट आणि ल्फोटिंग हेलिपॅडचाही प्रस्ताव असल्याचं गडकरींनी सांगितलंय. तसंच गेट वे ऑफ इंडियासमोर समुद्रात होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेडिओ क्लबच्या बाजुला नवीन जेट्टीचा प्रस्ताव असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
बीपीटीच्या अंतर्गत असलेल्या १८०० एकरच्या जमिनीचा विकास करण्यासाठी एक समिची स्थापन केली जाणार असल्याचंही गडकरींनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.