शाहरुखचा उल्लेख टाळत पूनम महाजनांची आयुक्तांकडे तक्रार

शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर बांधण्यात आलेल्या रॅम्पवरून सुरू झालेल्या वादात खासदार पूमन महाजन यांनी उडी घेतलीय. 

Updated: Feb 3, 2015, 04:03 PM IST
शाहरुखचा उल्लेख टाळत पूनम महाजनांची आयुक्तांकडे तक्रार  title=

मुंबई : शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर बांधण्यात आलेल्या रॅम्पवरून सुरू झालेल्या वादात खासदार पूमन महाजन यांनी उडी घेतलीय. 

महाजन यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवलं असून स्थानिकांना त्रास होत असल्यानं हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं, असं म्हटलंय. मात्र, या पत्रात महाजन यांनी शाहरूख खान किंवा मन्नत बंगल्याचा नामोल्लेख टाळल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. 

तसंच याबाबत मीडियाशी बोलण्यासही पूनम महाजन यांनी नकार दिलाय. वांद्रे भाग माझ्या लोकसभा  मतदारसंघात येतो. त्याभागातील लोकांच्या तक्रारीनुसार रस्तावरील अतिक्रमण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. यासाठी मी महापालिका आयुक्त यांना पत्र पाठवले आहे, असं महाजन यांनी सांगितलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.