मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा आणखी लांबण्याची शक्यता आहे. हा तिढा आणखी एक आठवडा सुटणार नसल्याची चिन्हं आहेत.
कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पाच तारखेपर्यंत परदेशात आहेत. त्यामुळं जागावाटपाच्या चर्चा खोळंबल्यात.
आता शरद पवार भारतात परतल्यानंतरच जागावाटपाची चर्चा पुन्हा सुरु होणार आहे.
दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील सर्व जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.