मुंबई : एटीएममध्ये कॅश नसल्याने, पैसे काढण्यासाठी पुन्हा रांगा लागल्याचं चित्र आहे, मात्र अनेक ठिकाणी कॅश नसल्याने पुन्हा एकदा नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबईत रविवारी अनेक ठिकाणी एटीएममध्ये कॅश नसल्याच्या तक्रारी होत्या. मुंबई, नवी मुंबई, पुणे यांसह राज्यभरातील अनेक एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
केवळ मुंबई पुण्यासारखी मोठी शहरं नाहीत, तर जिल्हा आणि तालुक्यांच्या ठिकाणी देखील कॅश नसल्याने, नागरिक त्रस्त आहेत.
पंतप्रधान नरेंद्र बंदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि हजार रूपयाच्या जुन्या नोटाबंदीचा निर्णय घेतला होता, त्यावेळी देखील एटीएमसमोर पैशांसाठी रांगा लागल्या होत्या, यानंतर पुन्हा पहिल्यांदा एकदा नागरिकांची पैशांसाठी एटीएमची शोधाशोध सुरू आहे. मात्र ९० टक्के एटीएममध्ये कॅश नसल्याचं दिसून येत आहे. एटीएममध्ये मागील आठवड्यात कॅश नसल्याच्या तक्रारी होत्या, मात्र पहिल्यांदा आणखी कॅश नसल्याचं तीव्रतेने जाणवत आहे.