मॉडेलनं केली 'डीआयजी'वर बलात्काराची तक्रार दाखल

एका मॉडलनं मुंबईच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केलाय, त्यामुळे गृह खातंही हादरून गेलंय. 

Updated: Jul 24, 2014, 05:03 PM IST
मॉडेलनं केली 'डीआयजी'वर बलात्काराची तक्रार दाखल   title=

मुंबई : एका मॉडलनं मुंबईच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केलाय, त्यामुळे गृह खातंही हादरून गेलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या मॉडेलनं दाखल केलेल्या तक्रारीत डीआयजी सुनील पारसकर यांच्या विरुद्ध मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केलीय. 

पारसकर यांनी मालाडस्थित एका थ्री स्टार हॉटेलमध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचं, मॉडलनं आपल्या तक्रारीत म्हटलंय. 

पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणाबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय. तर, मुंबई पोलीस आयुक्तांनी या आरोपांच्या तातडीनं चौकशीचे आदेश दिलेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.