राज ठाकरेंची नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणुकीतून माघार?

मनसेच्या एका मोठ्य़ा निर्णयाची...... नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक मनसे लढणार नाही, राज ठाकरेंनी हा निर्णय घेतलाय.  

Updated: Mar 26, 2015, 08:46 PM IST
राज ठाकरेंची नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणुकीतून माघार? title=

मुंबई : मनसेच्या एका मोठ्य़ा निर्णयाची...... नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक मनसे लढणार नाही, राज ठाकरेंनी हा निर्णय घेतलाय.  
या संदर्भात राज ठाकरे यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसून येत्या काही दिवसात एका निवेदनाच्या माध्यमातून आपण या दोन्ही निवडणुका का लढवत नाही याचे स्पष्टीकरण देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. 

मनसेनं नवी मुंबईत काय केलं ?
2010 च्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे 40 उमेदवार 
40 उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही 
2010 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले 
2014 विधानसभेत मनसे दोन जागा लढली, दोन्ही जागांवर दारुण पराभव

मनसेनं औरंगाबादमध्ये काय केलं ?
2010 औरंगाबाद मनपा निवडणुकीत मनसेनं 99 पैकी 54 उमेदवार दिले
54 पैकी 1 उमेदवारच निवडून आला  
गेल्या वेळेला औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युती होती 
गेल्या वेळेला औरंगाबादमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती 
2014विधानसभा निवडणुकीत मनसेनं 9 पैकी 5 जागा लढवल्या.दारुण पराभव

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.