मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 40 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली.
राज ठाकरे आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक वर्षा निवासस्थानी दाखल झालेत. या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची मागिल दोन महिन्यांमधील ही तिसरी भेट आहे. दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय आहे.
दरम्यान, नाशिकमधली पुरस्थिती आणि झालेलं नुकसान, वाहन परवान्यांसाठी मराठीची सक्ती, डोमेसाईल सर्टिफिकेट अशा विषयांवर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं समजते. यावेळी राज ठाकरे यांच्याबरोबर बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या भेटीबद्दल आज राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.