दुपारी ४.३० वाजता -
आघाडीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार, आघाडी राष्ट्रवादीलाच तोडायची आहे, नारायण राणेंची रोखठोक भूमिका
दुपारी ३.२५ वाजता -
मुख्यमंत्री कराडहून आल्यानंतर जागावाटपाबाबत बैठक होणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
आज रात्री उशीरा वर्षावर होवू शकते बैठक
अशक्य अटी घातल्यास आघाडी होणं कठीण, कराडमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
दुपारी १.४० वाजता -
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वबळावर लढण्याचे संकेत, थोड्याच वेळात होऊ शकते घोषणा... काँग्रेसच्या १२८ जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीला अमान्य
सकाळी ११.२० वाजता-
काँग्रेसची राष्ट्रवादीला १२८ जागांची ऑफर... राष्ट्रवादीची बैठक सुरूच...
सकाळी ९.३० वाजता -
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक अजित पवार यांच्या घरी सुरु आहे. आघाडीच्या भवितव्याबाबत त्यात चर्चा होतेय. शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सगळे महत्वाचे नेते या बैठकीला हजर आहेत.
मुंबई: आघाडीतही बिघाडी होण्याची चिन्हं आहेत. १४४ जागांच्या मागणीवर राष्ट्रवादी ठाम आहे.
दरम्यान काँग्रेसनं राष्ट्रवादीसमोर १२८ जागांचा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीनं १४४ जागांचा आग्रह कायम ठेवल्यास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपासंदर्भात संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये १४४ जागांसह अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी राष्ट्रवादीनं केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.