राजीनाम्याआधी खडसेंसमोरचे ५ पर्याय

भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला, तर त्यांच्यासमोर राजीनाम्याआधी कोणता पर्याय शिल्लक राहतो, हे महत्वाचे आहे. 

Updated: Jun 2, 2016, 08:58 AM IST
राजीनाम्याआधी खडसेंसमोरचे ५ पर्याय title=

मुंबई : भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला, तर त्यांच्यासमोर राजीनाम्याआधी कोणता पर्याय शिल्लक राहतो, हे महत्वाचे आहे. 

राजकीय वर्तुळात खालील तर्क लावले जात आहेत. खाली दिलेले ५ पर्याय, हा एक पर्याय संपल्यानंतर दुसरा पर्याय काय असेल ते क्रमाने देण्यात आले आहेत, असे एकानंतर एक पाच पर्याय देण्यात आले आहेत.

१) सर्वात पहिल्यांदा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणे, नागपुरला संघ कार्यालयात जाऊन आपलं काही चुकतंय का हे समजून घेणे.
२) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुभवी नेत्यांच्या भेटीगाठी घेणे, सल्ला मसलत करणे.
३) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणे, ही राजकीय दृष्टीकोनातून खडसेंसाठी ही काळाची गरज आहे.
४) आपल्या समर्थक आमदारांची संख्या मोठी असल्यास, राज्याच्या राजकीय समीकरणाचा वेध घेणे.
५) समर्थक आमदारांची संख्या कमी असल्यास, आणि बंड करणे हे न परवडल्यास, कधी राज्यपाल पद मिळेल का याची वाट पाहत शांत बसणे.