मुंबई : अखेर तो आला आणि सारेचं मंत्रमुग्ध झाले. सकाळीच त्यानं हजेरी लावली आणि मुंबईकरांना विकएंड गिफ्ट दिलं..
विकेंडला मुंबईकरांवर वरुणराजानं आपली कृपादृष्टी दाखवलीय. सकाळपासूनच दक्षिण मुंबईत पावसानं हजोरी लावल्यानं मुंबईकरांच्या चहाला आणखीनच रंगत आली.
पहिल्या पावसाचा अस्वाद घेत मुंबईकरांनी ऑफिस गाठलं. मुंबईसह उपनगरं आणि ठाणे कल्याणमध्येही आभाळ भरुन आलंय. कोणत्याही क्षणी या भागात पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता आहे.
Rainfall in Chembur, Mumbai. Mumbai MET dept says, " These arent monsoon rains, just pre-monsoon showers" pic.twitter.com/WhWqriROVw
— ANI (@ANI_news) June 11, 2016
"Monsoon may take few more days to arrive Mumbai", says the Mumbai MET Department pic.twitter.com/NM3gjTlKfC
— ANI (@ANI_news) June 11, 2016
दरम्यान, हा मान्सूनचा पाऊस नसल्याचं हवामानशास्त्र विभागानं स्पष्ट केलंय. हा मान्सूनपूर्व पाऊस आहे... काही दिवसांतच मान्सूनचा पाऊसही मुंबईत दाखल होईल, असं तज्ज्ञांनी म्हटलंय.