मुंबई : राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस सरकार पडेल, असे भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते. त्याचेवळी त्यांनी सांगितले, मध्यावधी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सज्ज आहे.
अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालांनंतर राज्यातलं फडणवीस सरकार कोसळेल असे भाकित पवार यांनी वर्तवलंय. ते झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णय सामान्यांना भावला, कारण त्यातून काळा पैसा बाळगणाऱ्यांचं घबाड उघड होईलं, असं सुरुवातीला सर्वांना वाटलं होतं. पण तसं काहीही घडलं नाही.
उलट सरकारने दिलेल्या आकेडवारीत मनरेगाअतंर्गत काम करणाऱ्यांची संख्या नोटाबंदीच्या काळात 80 लाखांवर गेल्याचा दावा पवारांनी केला. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारला बसेल, असंही पवारांनी म्हटले.