तुमच्या पैशांचा गल्ला चेक करा...

 अनेकांनी आपली छोटी बचत म्हणून पिगी बँक, गल्ला, पिठाच्या डब्यात, माळ्यावर पैसे ठेवले असतील. 

Updated: Nov 8, 2016, 09:42 PM IST
तुमच्या पैशांचा गल्ला चेक करा... title=

मुंबई :  अनेकांनी आपली छोटी बचत म्हणून पिगी बँक, गल्ला, पिठाच्या डब्यात, माळ्यावर पैसे ठेवले असतील. 

अशा व्यक्ती आपले या पैशांमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा किती आहे ते त्वरित चेक करा.

वाढदिवसाचे पैसे...

अनेकांना वाढदिवसानिमित्त पैसे मिळत असता. आज महागाईमुळे ५०० ते १००० रुपयांच्या नोटा गिफ्ट  मिळतात.  अशा नोटा अनेक जण गल्ल्यामध्ये ठेवत असतात. छोटी बचत म्हणून याकडे पाहिले जाते. 

गृहिणींची बचत 

गृहिणी आपल्या संसाराला भविष्यात पैसे उपलब्ध व्हावे यासाठी घरखर्चातून काही रक्कम बाजूला ठेवतात. अशात ५०० आणि १०००च्या नोटा असू शकतात. त्यामुळे त्यांनीही अशा नोटा कुठे ठेवल्या याचा शोध घ्यावा आणि त्या आपल्या खात्यात पैसे जमा करावे. 

५० दिवसांची आहे मुदत...

१० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ पर्यंत ५० दिवसात तुम्हांला पैसे कमी करता येणार आहे. पहिल्या १५ दिवसापर्यंत ४००० हजार पर्यंत तुम्ही बँकेतील खात्या पैसे जमा करू शकतात. त्यानंतर पुढील पंधरा दिवसात निधीची उपलब्धता लक्षात ठेवून पैसे जमा करण्याची मर्यादा वाढविण्यात येणार आहे.  

५० दिवसांनंतर तुम्ही कुठे बदलणार पैसे..

ज्याने ५० दिवसांच्या मुदतीत पैसे भरले नाही. तर रिझर्व बँकांचे सेंटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात आपला पैसा बदलण्यात येणार आहे.