Aamir Khan on Son Junaid Khan's Movie : बॉलिवूड अभिनेता जुनैद खान त्याच्या महाराज या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. आमिर खानचा मुलगा असलेल्या जुनैदचा आता मोठ्या पडद्यावर पहिला आणि अभिनय करत असलेला असा दुसरा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यावर आता आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं असून त्यानं अपयशाला घेऊन अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.
आमिर खाननं सांगितलं की हा प्रोजेक्टशी जेव्हा त्याचा मुलगा जोडला गेला तेव्हापासून त्याला या सगळ्याची चिंता वाटत होती. तर दुसरीकडे जुनैदची स्तुती करत त्याला बुद्धिमान म्हटलं आहे आणि म्हटलं की तो त्याचा रस्ता शोधत आहे. मुलगा जुनैदचा लवयापामध्ये कसा परफॉर्मन्स होता याविषयी आमिरनं एबीपीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जुनैदचा लवयापा हा चित्रपट चालला नाही. मला या गोष्टीचं फार वाईट वाटतंय. मला वाटतं की चित्रपट चांगला आहे आणि जुनैदनं देखील चित्रपटात चांगलं काम केलं होतं. पण तो चित्रपट चालला नाही. एक वडील म्हणून माझ्या तुलनेत जुनैदच्या चित्रपटासाठी 10 टक्के जास्त तनावात होतो.
आमिर याविषयी सविस्तर सांगत म्हणाला, 'प्रदर्शनाच्या दोन आठवड्या आधी मी खिडकीत बसलो होतो आणि विचार करत होतो की मी का एवढा विचार करतोय? हा माझा चित्रपट देखील नाही. मी ना चित्रपटाची निर्मिती केली आणि ना ही मी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. मी एकदा पण सेटवर गेलो नाही. मी फक्त लांबून हे सगळं पाहत होतो पण माझ्या हृदयात सारखी धडधड व्हायची. मला वाटतं होतं की हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे. या एका वडिलाच्या भावना आहेत आणि मला माहित नव्हतं की मी त्या कशा दाखवू.'
हेही वाचा : उर्वशी रौतेला करणार ऑरीशी लग्न? चाहते म्हणाले 'पुरुषाशी लग्न करणारी पहिली भारतीय स्त्री'
दरम्यान, आमिर खाननं सांगितलं की तो लवकरच जुनैद खानच्या एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे. त्या प्रोजेक्टवर त्याचं काम सुरु झालं आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत हा चित्रपट थिएटमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.