७/११ च्या बॉम्बस्फोटप्रकरणाच्या निकालाची आज शक्यता

७/११ च्या बॉम्बस्फोटांप्रकरणी आज निकाल लागण्याची शक्यता आहे. तब्बल नऊ वर्षांनी मुंबई रेल्वेतील साखळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. 

Updated: Sep 14, 2015, 09:28 AM IST
७/११ च्या बॉम्बस्फोटप्रकरणाच्या निकालाची आज शक्यता title=

मुंबई : ७/११ च्या बॉम्बस्फोटांप्रकरणी आज निकाल लागण्याची शक्यता आहे. तब्बल नऊ वर्षांनी मुंबई रेल्वेतील साखळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. 

मुंबई शहरातील पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी स्फोटांप्रकरणी कोर्टाने १२ जणांना दोषी ठरवलं. तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. १२ जणांना 120 (ब), 302 आणि 311 कलमाअंतर्गत दोषी धरण्यात आलं आहे.

मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावर झालेल्या बॉम्बस्फोटात तब्बल १८९  जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच ८०० हून अधिक जण जखमी झाले होते. ११ जुलै २००६रोजी लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदर या ठिकाणी हे स्फोट झाले होते.

या बॉम्बस्फोटाप्रकरणी मुंबई पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित सादिक शेखसह चार जणांना अटक केली होती. त्यांनी चौकशीदरम्यान २००६ च्या साखळी स्फोटात हात असल्याची कबुली दिली होती.

११ मिनिटांमध्ये झालेल्या या स्फोटांनी मुंबई हादरली होती. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात ७ स्फोट झाले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.