सांताक्रुझमध्ये ७ मजली इमारत चाळीवर कोसळली

मुंबईतल्या सांताक्रुझमधील यशवंतनगर परिसरातील न्यू शंकरलोक नावाची सात मजली इमारत कोसळलीय. ही इमारत शेजारच्या चाळीवर कोसळली. त्यामुळं या ढिगाऱ्याखाली लोकं अडकले असल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या ७-८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 14, 2014, 07:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या सांताक्रुझमधील यशवंतनगर परिसरातील न्यू शंकरलोक नावाची सात मजली इमारत कोसळलीय. ही इमारत शेजारच्या चाळीवर कोसळली. त्यामुळं या ढिगाऱ्याखाली लोकं अडकले असल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या ७-८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
`न्यू शंकरलोक` ही इमारत जुनी असली कारणानं ती आधीच रिकामी करण्यात आली होती. मात्र तरीही दोन कुटुंब त्या इमारतीत वास्तव्यास होते. त्यामुळं हे कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे. तसंच इमारत ज्या शेजारच्या चाळीवर कोसळली. त्या चाळीतही ४० कुटुंब राहतात. त्यामुळं तिथले नागरिकही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची कळतंय.
दरम्यान, चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलंय. जवळच्याच व्ही. एन. देसाई हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.