मुंबईवर धुळीची छाया कायम

मुंबईमध्ये आकाशात सलग दुस-या दिवशीही धुळीचे लोट कायम आहेत. अचानक आलेल्या या धुळीमुळं लोक बेचैन आहेत. अरबस्थानात आलेल्या वादळाचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात आले आहे.

Updated: Mar 22, 2012, 10:59 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईमध्ये आकाशात सलग दुस-या दिवशीही धुळीचे लोट कायम आहेत. अचानक आलेल्या या धुळीमुळं लोक बेचैन आहेत. अरबस्थानात आलेल्या वादळाचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात आले आहे.

 

 

नासानंही या धुळीची दखल घेतली असून, त्यांनी प्रकाशित केलेल्या फोटोत ही माहिती देण्यात आलीय. गुजरात आणि उ. भारतात अनेक ठिकाणी हे धुळीचं साम्राज्य पसरलय.  उत्तरेकडून आलेल्या वा-याबरोबर मुंबईत विशेषतः उपनगरांमध्ये आकाशात धुळीचे लोट दिसून येताहेत. उत्तर आफ्रिका, गल्फ आणि राजस्थानामध्ये आलेल्या धुळीच्या वादळाचा हा परीणाम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याबरोबर ही धूळ आली असल्याचं सांगण्यात येत. मुंबईत विशेषतः उपनगरांमध्ये आकाशात धुळीचं साम्राज्य पसरलं, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

 

 

या धुळीमुळे तापमान काही प्रमाणात घट झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. धुळीमुळे काही अंतरावरील इमारती तसंच वाहनंही दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे हवेतील धुळीमुळे नागरिकांमध्ये कुतूहल आणि  काळजी व्यक्त केली जात आहे. तापमानातील फरकामुळे मुंबईतील वातावरणात धूळ आणि धुके निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवेचा वेग काही तासांनी वाढला की ही परिस्थिती बदलेल अशी माहिती हवामान खात्याने सांगितले आहे.

 

मुंबईकरांना होणार धुळीचा त्रास...व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="70071"]