रुग्णवाहिकेत ऑक्सिजनच्या सिलिंडरचा स्फोट, अर्भकाचा मृत्यू

एखाद्या रुग्णवाहिकेतला ऑक्सिजन किती घातक असू शकतो. याचा प्रत्यय ठाण्यात आला. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतल्यानं एक दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू झालाय. डॉक्टरसह परिचारिका जखमी झालेत . 

Updated: Dec 11, 2015, 11:00 AM IST
रुग्णवाहिकेत ऑक्सिजनच्या सिलिंडरचा स्फोट, अर्भकाचा मृत्यू

ठाणे  : एखाद्या रुग्णवाहिकेतला ऑक्सिजन किती घातक असू शकतो. याचा प्रत्यय ठाण्यात आला. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतल्यानं एक दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू झालाय. डॉक्टरसह परिचारिका जखमी झालेत . 

या रुग्णवाहिकेला आग लागल्यानं शेजारची दुसरी रुग्णवाहिकाही पेटली. स्फोटाच्या हाद-यानं इमारतीच्या खिडक्यांची काचाही फुटल्या. त्यामुळं नागरिक भयभयीत झाले. भिवंडी येथील काल्हेर येथे राहणारे मनीष जैन यांच्या एक दिवसाच्या अर्भकाला श्वसनाचा त्रास होत होता. ठाण्यातील वर्तकनगरमधील वेदांत रुग्णालयात त्याला आणण्यात आलं. नंतर त्याला मुंबईच्या सूर्या नर्सिंग होम या रुग्णालयात नेण्यात येणार होतं. चालकानं रुग्णवाहिका सुरु करताच अचानक ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतला. 

यात अर्भकाचा मृत्यू झाला. सूर्या नर्सिंग होमचे डॉ. भवनदीप गर्ग आणि परिचारिका लीला चाको जखमी झालेत. या दोघांनी गाडीतून पळ काढल्यानं त्यांचा जीव वाचला. ठाणे मनपाच्या अग्नशिमन दलानं आग आटोक्यात आणली. त्यामुळं पुढील अऩर्थ टळला. बालकाची आई किर्ती जैन यांच्यावर भिवंडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.