नागपूर विमानतळावर ISISच्या तीन संशयितांना अटक

मुंबईच्या मालवणीतील काही तरूण आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याची बातमी ताजी असतानाच एटीएस अधिकाऱ्यांनी ISISमध्ये सामील होण्यास जाणाऱ्या तीन तरूणांना नागपूर विमानतळावर अटक केली आहे.

Updated: Dec 26, 2015, 08:06 PM IST
नागपूर विमानतळावर ISISच्या तीन संशयितांना अटक title=

नागपूर : मुंबईच्या मालवणीतील काही तरूण आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याची बातमी ताजी असतानाच एटीएस अधिकाऱ्यांनी ISISमध्ये सामील होण्यास जाणाऱ्या तीन तरूणांना नागपूर विमानतळावर अटक केली आहे.

अब्दुल वसीम, उमर हसन फारुखी, माज हसन फारुख अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहे. हे तिघेही तेलंगणाचे रहिवासी आहेत. हैदारबादमधील हे तीन तरुण इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी अफगणिस्तानकडे जात होते. 

याची माहिती मिळाल्यानंतर त्या तिघांना नागपूर विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना  हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांना याबाबतची माहिती एटीएसला दिल्यानंतर आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना सापळा रचून पकडण्यात आले.