विषारी सापाशी खेळणे तरुणाच्या जीवावर बेतले

साप पकडून त्याच्याशी खेळणे एका तरुणाच्या जीवावर बेतले होते. सापबरोबर खेळ करण्यात या तरुण मग्न होतो. हा खेळ पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरु होता. सापाला घेऊन बाईकवरुन जात असताना त्यांने चावा घेतला. त्यामुळे या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करुन जीव वाचविण्यात यश आले.

Updated: Oct 10, 2015, 10:44 PM IST
विषारी सापाशी खेळणे तरुणाच्या जीवावर बेतले title=

बारामती : साप पकडून त्याच्याशी खेळणे एका तरुणाच्या जीवावर बेतले होते. सापबरोबर खेळ करण्यात या तरुण मग्न होतो. हा खेळ पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरु होता. सापाला घेऊन बाईकवरुन जात असताना त्यांने चावा घेतला. त्यामुळे या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करुन जीव वाचविण्यात यश आले.

बारामती तालुक्यातील सांगवी येथील शंभू तावरे हा युवक नागाशी खेळ करत होता. मात्र, नागाने त्याची चांगलीच खोड मोडली. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या समोर सुरू होता. 

काही सर्प मित्रांच्या अशा चुकीच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे मनापासून काम करणाऱ्या प्राणी मित्रांची बदनामी होत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ज्या नाग सापाशी तो खेळत होता तो भयंकर विषारी होता. मात्र वेळेत उपचार झाल्याने शंभूचा जीव वाचला. अतिरेक करणाऱ्या अशा सर्पमित्रांवर कारवाई करण्याची मागणी प्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.