राज्यात पावसाची प्रतिक्षा, 6 जुलैपासून जोर

 संपूर्ण राज्यभरात पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहिली जातेय. पण पावसानं मुंबईकरांना सरप्राईझ दिलं. सलग दुस-या दिवशी पहाटेपासून रिमझिम पाऊस आहे. मुंबईत आजही अशाच पद्धतीनं पाऊस राहिल असा अंदाज वेध शाळेनं वर्तवलाय. दरम्यान, राज्यात  ६ जुलैपासून मुसळधार पावसाळा सुरु होईल, असं भाकीत करण्यात आलंय.

Updated: Jul 3, 2014, 09:46 AM IST
राज्यात पावसाची प्रतिक्षा, 6 जुलैपासून जोर title=

मुंबई : संपूर्ण राज्यभरात पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहिली जातेय. पण पावसानं मुंबईकरांना सरप्राईझ दिलं. सलग दुस-या दिवशी पहाटेपासून रिमझिम पाऊस आहे. मुंबईत आजही अशाच पद्धतीनं पाऊस राहिल असा अंदाज वेध शाळेनं वर्तवलाय. दरम्यान, राज्यात  ६ जुलैपासून मुसळधार पावसाळा सुरु होईल, असं भाकीत करण्यात आलंय.

मुंबई आणि उपनगरांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झालीय. तर आजही पावसाची परिस्थिती अशीच राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. मुंबई ठाण्यासह कोकण, कोल्हापूर आणि नाशिकच्या काही भागांत पावसाची नोंद झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलीय. आता पुढच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढेल, असं वेध शाळेने स्पष्ट केलंय.

यंदाचा मृग कोरडा गेला.निदान आर्द्रा नक्षत्रात तरी पाऊस पडेल, असा विश्वास शेतक-याला होता. बांधावर उभा राहून तो आभाळात दूरवर नजर टाकून आहे. आपलं हे भकास माळरान पाऊस कधी भिजवणार, असा प्रश्न त्याला पडला आहे. पण मृग आणि आर्द्रानं दडी दिल्यानंतर, पुनर्वसू नक्षत्र मात्र शेतक-यांना सुखावणार आहे. या नक्षत्रात पडणारा तरणा पाऊस बळीराजाला तारणार आहे. ६ जुलैपासून मुसळधार पावसाळा सुरु होईल, असा अंदाज पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केलाय.

मुंबईत सलग दुस-या दिवशी पाऊस पडतोय. मात्र जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत केवळ २० टक्केच पाऊस झाल्यानं मुंबईमध्ये वीस टक्के पाणी कपातीचा निर्णय स्थायी समितीनं घेतलाय. आजपासून पाणीकपात सुरू झाली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.