रत्नागिरीतील चार अपघातांत तीन ठार, १९ जखमी

रत्नागिरी जिल्हयात वेगवेगळ्या चार अपघातांत तीन ठार तर १९ जण जखमी झालेत. मुंबई-गोवा महामार्गावर रात्री उशिरा लवेल येथे झालेल्या अपघातात सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका अधिकाऱ्यांचा मृत्यू ओढवला. तर चार जण गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्या एका अपघात दोन जण ठार झालेत. चार अपघातांत १९ जण जखमी झालेत.

Updated: Nov 22, 2014, 11:25 AM IST
रत्नागिरीतील चार अपघातांत तीन ठार, १९ जखमी title=

मुंबई : रत्नागिरी जिल्हयात वेगवेगळ्या चार अपघातांत तीन ठार तर १९ जण जखमी झालेत. मुंबई-गोवा महामार्गावर रात्री उशिरा लवेल येथे झालेल्या अपघातात सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका अधिकाऱ्यांचा मृत्यू ओढवला. तर चार जण गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्या एका अपघात दोन जण ठार झालेत. चार अपघातांत १९ जण जखमी झालेत.

लवेल येथे कार आणि इन्होवा कारमध्ये अपघात झाला. चिपळूण पाटबंधारे विभागातील काही अधिकारी रात्री प्रवास करीत होते. या अपघातात चार अधिकाऱ्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर चार जण जखमी आहे. यात उपविभागीय अभियंता आलंदकर, शाखा अभियंता फर्नांडीस हे जखमी आहेत.

पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता टिकेकर यांचा मृत्यू झाला. तर चार जणांवर उपचार सुरु आहेत. जखमींना कराड येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

भोस्ते घाटात कंटेनर आणि एसटीमध्ये झालेल्या अपघातात एसटीतील ७ प्रवासी जखमी झालेत. कंटेनरने एसटीच्या एका बाजुचा पत्रा कापत नेला. जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चिपळूण- कराड राज्य मार्गावर झालेल्या अपघात दोन जण ठार झालेत. सुखदेव पवार (६६, कोळकेवाडी), रमेश पवार (५०, कालुस्ते) याचा समावेश आहे. तर दुसऱ्या एका अपघातात बसने टॅंकरला धडक दिली. यामध्ये १५ प्रवासी जखमी झालेत. हा अपघात जगबुडी पुलाजवळ झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.