पालघरमध्ये त्रिशंकू स्थिती, कॉंग्रेस भुईसपाट

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत ५७ पैकी भाजपला २१ तर शिवसेनेला १५ तसेच बहुजन विकास आघाडीला १० जागा मिळाल्या आहेत. माकपाला ५, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या असून १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसलाय. केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

Updated: Jan 31, 2015, 08:54 AM IST
पालघरमध्ये त्रिशंकू स्थिती, कॉंग्रेस भुईसपाट title=

पालघर : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत ५७ पैकी भाजपला २१ तर शिवसेनेला १५ तसेच बहुजन विकास आघाडीला १० जागा मिळाल्या आहेत. माकपाला ५, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या असून १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसलाय. केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

पालघर जिल्हा परिषदेत सत्तेवर येण्यासाठी किमान २९ जागा मिळून बहुमतासाठी आवश्यक आहे. मात्र, तो आकडा कोणत्याच पक्षाला गाठता आलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. 

पालघरचा निकाल खालीलप्रमाणे -
तलासरी : उपलाट- कौशिका डोंबरे (माकप), तलासरी- धर्मा गोवारी (भाजप), संभा- जयवंती गोरखणा (माकप), वसा- सुनीता शिंगडा (भाजप), कुर्झे- गीता धामोडे (अपक्ष).

डहाणू : बोर्डी- विजय खरपडे (भाजप), आंबेसरी- मेरी रावला (माकप), मोडगाव- काशीनाथ चौधरी (राष्ट्रवादी), सायवन- कल्पना कामडी (भाजप), विवळवेढे- सुरेखा मलावकर (बविआ), मुरबाड- किशोर बरड (बविआ), गंजाड- रडका कलगंडा (माकप), कैनाड- लक्ष्मी ठाकरे (भाजप), डेहणे- हेमलता राठोड (भाजप), आसनगाव- विनिता कोरे (भाजप), वाणगाव- विपुला सावे (कॉंग्रेस आय), रवंकोळ- दीपा ठेपमा (राष्ट्रवादी).

विक्रमगड : वेहेलपाडा- प्रमिला काकड (भाजप), उटावली- सिंधू भोये (भाजप), दादडे- सुनीता चोथे (भाजप), कुर्झे- वैष्णवी रहाणे (शिवसेना), आलोंडे- दर्शना दुमाडा (भाजप).

जव्हार : वावरवांगणी- रतन बूधर (माकप), हिरडपाडा- सुरेखा थेतले (भाजप), पन्थाहळे- सुरेश कोरडा (भाजप), कोरवड- अशोक भोये (भाजप), पाथर्डी- गुलाब राऊत (शिवसेना).

मोखाडा : मोर्‍हांडा- पार्वती भुसारा (राष्ट्रवादी), सार्तुर्ली- प्रकाश निकम (शिवसेना), सायदे- दिलीप घाटे (भाजप).

वाडा : दाहे- भालचंद्र खोडके (शिवसेना), मोज- कीर्ती हावरे (शिवसेना), वाडा- नीलेश गंधे (शिवसेना), मांडा- भारती मडी (शिवसेना), पालसई- सुवर्णा पडवळे (भाजप), कुडूस- धनश्री चौधरी (भाजप).

पालघर : तारापूर- शुभांगी कुटे (शिवसेना), नवापूर- तुळसीदास तामोरे (शिवसेना बंडखोर), पास्थळ- नेहा शेलार (भाजप), बोईसर- अशोक वडे (भाजप), बोईसर वंजारवाडा- रंजना संखे (भाजप), सरावली- मिताली राऊत (शिवसेना), खैरेपाडा- भावना विचारे (बविआ), मान- चेतन घोडी (शिवसेना), बर्‍हाणपूर- जयवंत गुरोडा (बविआ), कोंढाण- नीता पाटील (शिवसेना), दहिसरतर्फे मनोर जीवन सांबरे (बविआ), नंडोरे देवखोप- कमळाकर दळवी (शिवसेना), सातपाटी- सचिन पाटील (शिवसेना), शिरगाव- घनश्याम मोरे (शिवसेना), मायखोप- योगेश पाटील (बविआ), विराथन- दामोदर पाटील (राष्ट्रवादी), नवघर घाटीम- सुरेश तरे (बविआ).

वसई : भाताणे- कल्याणी तरे (बविआ), तिल्हेर- तृप्ती किणी (शिवसेना), अर्नाळा- देवराम पाटील (बविआ), कळंब- राजाराम तांडेल (बविआ).

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.