औरंगाबाद : स्वबळावर लढण्याची भाषा भाजपनं सुरू केल्यानंतर आता शिवसेनेतही तशाच पद्धतीनं मागणी होऊ लागली आहे.
शिवसेनेत स्वबळावर लढण्याची भाषा आता मुंबईनंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत झाली आहे. उद्धव ठाकरेंनी आदेश दिले तर औरंगाबादच्या सर्व 9 जागा लढवणार आणि जिंकणार असा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केलाय.
शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी केलेली ही मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही उचलून धरली आहे.
शिवसेनेची ताकद पाहून भाजपनं युती केली. पण आजकालची पोरं स्वबळावर लढण्याची भाषा करतायत, अशा शब्दांत खासदार चंद्रकांत खैरे त्यांनी भाजपची खिल्ली उडवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.