नांदेड : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध करताना मुंबई भाजपचे माजी सदस्य आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन अध्यक्षचे सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई हल्ला केला. हा हल्ला इतिहासातील काळ्या अक्षराने लिहिली जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका करताना दिली.
अधिक वाचा - शाई हल्ला : शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक, जामीन
शिवसेनेने केलेला अशाप्रकारचा हल्ला हा देशाच्या इतिहासातील काळ्या अक्षराने लिहिली जाईल, अशी घटना असल्याची टीका चव्हाण यांनी केली. हल्ला करणाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
अधिक वाचा : पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कसुरींचा मोदीना टोला
कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींवर अशा प्रकारच हल्ला करणे हे निंदनीय असल्याचे चव्हाण म्हणाले. जर अशी भूमिका घ्याचीचच असेल तर केंद्र सरकारने पाकिस्तानातील लोकांना इकडे येण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा, असे चव्हाण म्हणाले.
शिवसेना आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम असेल तर मुख्यमंत्र्यांनीही ठाम राहून हल्ला करणाऱ्यांवर कारवाई, करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.